You are currently viewing स्टिकी ट्रॅप आणि त्याचे पिकामध्ये महत्व :

नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण स्टिकी ट्रॅप आणि त्याचे पिकामध्ये महत्व, stiky ट्रॅप म्हणजे काय, त्याचे प्रकार, कोणत्या प्रकारचा ट्रॅप कोणत्या किडी साठी वापरावा,एकरी किती ट्रॅप लावावे आणि खर्च किती असे सर्व प्रश्नांची उत्तरे या लेखामध्ये मिळणार आहेत.

Stiky ट्रॅप म्हणजे एक प्रकारचे 22 x 28 cm चे कार्ड असते आणि त्यावर डिंक ऑर चिकट द्रव असते ज्यामुळे कीटक त्यावर एकदा चिकटला तर तो सहसा निघत नाही.

स्टिकी ट्रॅप आणि त्याचे पिकामध्ये महत्व: शेतकरी मित्रानो आपण जर आपल्या बागेत sticky ट्रॅप लावले तर त्यावर कोणत्या प्रकारचे कीटक or पेस्ट चिकटली आहे ते बघून आपण बागेत त्या कीटक वर spry घेऊन आपण वेळीच त्या कीटक पासून आपल्या पिकाचे संरक्षण करू शकतो.

तसेच त्या sticky ट्रॅप वर एखादा कीटक चिकटला तर त्याचे पासून होणारी पुढील त्याची लाईफ सायकल(अंडी देणे — अळी अवस्था — कोश अवस्था या सर्व वर नियंत्रण मिळवता येते.

Yellow stiky trap ( पिवळा ट्रॅप)

या color चे sticky ट्रॅप मुख्य करून पांढरी माशी (white fly) aphid, jasid, तुडतुडे (Thrips) यांना attract करते.

Blue sticky trap ( निळा ट्रॅप)

या कलर च ट्रॅप मुख्य करून Thrips आणि shoot weevil साठी वापरतात

Green sticky Trap: ( हिरवा ट्रॅप)

Target pest: फळमाशी ( fruit fly) shoot weevil, leaf hopper

पांढरा ट्रॅप हा पिवळ्या ट्रॅप प्रमाणे Aphid, thrips, white fly आणि इतर flying pest साठी वापरला जातो.

Red Sticky Trap (लाल ट्रॅप)

टार्गेट पेस्ट: Hopper, jasids, Aphid आणि काही beetle spp. साठी वापरला जातो.

मुख्य करून carot fly साठी, तसेच hopper आणि jassid नियंत्रणासाठी पण वापरला जातो.

शेतकरी मित्रानो चांगला रिझल्ट मिळण्यासाठी साधारणपणे एकरी ४०-५० sticky ट्रॅप वापरावेत. यापेक्षा जास्त वापरले तरी काही हरकत नाही.

किती खर्च येतो एकरी.

25 Trap चे एक पॉकेट 125-150 रुपयांपर्यंत असते. ( size नुसार किंमत फरक पडू शकतो)

Insect/Pest यांची छायाचित्रे

Aphid

वरील सर्व Aphid आहेत

White fly (पांढरी माशी)

(Thrips) तुडतुडे

स्टिकी ट्रॅप आणि त्याचे पिकामध्ये महत्व

Leaf hopper

शेतकरी मित्रांनी आपल्या पिकात कोणती पेस्ट आहे ती अगोदर पाहूनच त्या पेस्ट वरील कीटकनाशक खरेदी करावे आणि अवाढव्य खर्च कमी करावा हाच आमचा हेतू.

***धन्यवाद **

****@agrimania-in ***

agrimania.in

Agrimania platform