You are currently viewing वांगी २ जि.प शाळेचा परिसर भेट कार्यक्रम समाधान देशमुख यांच्या शेतात उत्साहात साजरा.
oplus_1026
परिसर भेट वांगी २
वांगी २ समाधान देशमुख यांच्या शेतात वनभोजन कार्यक्रम

वांगी २ जि.प शाळेचा परिसर भेट कार्यक्रम समाधान देशमुख यांच्या शेतात उत्साहात साजरा.

आज वांगी २ येथील समाधान देशमुख यांच्या शेतात वनभोजन व परिसर भेट कार्यक्रम आयोजित केला होता. त्या निमित्ताने आज दिनांक १०/२/२०२५ रोजी सकाळी ११ वाजलेपासून ते ४ वाजेपर्यंत विद्यार्थी आणि शिक्षक यांनी या नयनरम्य अश्या उजनी जलाशयाचे परिसर भेटी दरम्यान भरघोस असा आनंद घेतला.

या परिसर भेटीमध्ये जिल्हा परिषद शाळा वांगी २, चौधरी वस्ती शाळा, आणि जाधव वस्ती शाळेतील विद्यार्थी-शिक्षक तसेच काहीचे पालक असे जवळपास १८०पेक्षा अधिक जण सहभागी होते.

परिसर भेट म्हणजे नक्की काय असते:

परिसर भेट म्हणजे एखाद्या विशिष्ट ठिकाणी जाऊन तेथील माहिती, वस्तू, आणि वातावरणाचा अनुभव घेणे. या भेटी शैक्षणिक, मनोरंजक, किंवा माहितीपूर्ण असू शकतात.

परिसरभेटीचे प्रकार

शैक्षणिक भेटी: शाळा किंवा महाविद्यालयांमार्फत विविध ठिकाणी जसे की संग्रहालय, ऐतिहासिक स्थळे, विज्ञान केंद्र, किंवा औद्योगिक क्षेत्रे येथे भेटी आयोजित केल्या जातात.

मनोरंजक भेटी: प्राणीसंग्रहालय, पर्यटन स्थळे, किंवा थीम पार्कमध्ये मनोरंजनासाठी भेटी दिल्या जातात.

सांस्कृतिक भेटी: धार्मिक स्थळे, कला प्रदर्शन, किंवा पारंपरिक गावे येथे संस्कृतीचा अनुभव घेण्यासाठी भेटी आयोजित केल्या जातात.

निसर्गरम्य भेटी: डोंगर, समुद्रकिनारे, किंवा उद्याने यांसारख्या नैसर्गिक ठिकाणी भेटी दिल्या जातात.

विद्यार्थी आनंद घेताना

परिसर भेटीचे का गरज आहे

  • ज्ञानात भर: नवीन गोष्टींची माहिती मिळते आणि अनुभव मिळतो.
  • समज वाढते: विविध स्थळांविषयी आणि संस्कृतीविषयी दृष्टीकोन व्यापक होतो. मनोरंजन:
  • रोजच्या जीवनातील ताण कमी होतो आणि आनंद मिळतो.
  • सामाजिक विकास: इतरांसोबत संवाद साधण्याची संधी मिळते.

परिसर भेट/ वन-भोजन ठिकाण:

वांगी २ येथील महाडिक वस्ती वरील समाधान देशमुख (ग्रामपंचायत सदस्य) यांचा शेतात आयोजित केली होती.

विध्यर्थीनी या भेटीत काय निरीक्षण केले:

विध्यर्थिनी आज उजनी जलाशय आणि त्याच्या सभोतालचा परिसराचे निरीक्षण केले तेव्हा त्यांना काही पक्षी दिसले, वेगवेगळ्या प्रकारचे मासे तसेच नदिय जीव दिसले, काही मासे मृत आढळले, गुरुजींनी त्यांना या सर्वांचे ओळख पटवून दिले तसेच काही मासे मृत पडलेले दिसले तेव्हा ते का मृत पडले आहेत याची कारणे सांगितले,नदीचे प्रदूषण कसे होते ते आपण थांवण्यासाठी आपण सर्वांनी नदी मध्ये प्लास्टिक, किंव्हा अभ्रक अश्या न कुजनाऱ्या वस्तू टाकले नाही पाहिजेत, तसेच खराब सांडपाणी सोडल्याने पाण्यातील जीव मरतात या अश्या साऱ्या गोष्टीची माहिती दिली. तसेच सभोतलचा परिसर मधील झाडे, पिके, मधमाशी, मित्र कीटक, शत्रू कीटक यांची ओळख करून दिली.

या परिसर भेटीत बालवाडीत शिकणारे मुलं मुली, तसेच पहिले ते सातवी पर्यंत चे सर्व वर्ग यात सहभागी होते. यात जिल्हा परिषद शाळा मधील शिक्षक पोपळघट सर (मुख्याध्यापक) बोराडे गुरुजी, राऊत गुरुजी बोराटे गुरुजी,आखाडे गुरुजी, गुळवे गुरुजी, पाखरे गुरुजी, अदलींग मॅडम तसेच जाधव वस्ती शाळेचे भारत मोरे गुरुजी, शिंदे गुरुजी, तसेच चौधरी वस्ती शाळेचे भानवसे गुरुजी, तकिक गुरजी आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले समाधान देशमुख ( ग्रा.प सदस्य) लक्ष्मण दादा महाडिक (प. स सभापती करमाळा), सचिन महाडिक, नितीन महाडिक, बंडू तावसे, अनिल सातव (मंडप सहकार्य) रविराज महाडिक, विष्णू महाडिक, दादा गवारे, तेजस माळी, योगेश भानवसे, संजय सातव आदी उपस्थित होते.

परिसर भेटी दरम्यान विद्यार्थी – शिक्षक आनंद घेतानाचे काही छायचीत्रे.


विद्यार्थी परिसर भेटीचा आनंद घेऊन परतताना टिपलेले छायचीत्र.
समाधान देशमुख यांचा खरबूज प्लॉट

आमचे इतर लेख पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

केळी पिकातून ३० गुंठ्यांत कमावले ७ लाखाचे उत्पन्न

आमच्या utube चॅनल ल सबस्क्राईब करा

U tube लिंक येथे क्लिक करा

agrimania.in

Agrimania platform