
- योजनेचे स्वरूप
- लाभार्थी पात्रता
- अपात्राता
- कागदपत्रे काय
- अर्ज करण्याची मुदत कधीपर्यंत
- पाहिल हप्ता कधी भेटणार
- अर्ज कसा भरावा मोबाईल वरून स्वतः
योजनेचे स्वरूप :-
पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण (Direct Benefit Transfer)
सक्षम बैंक खात्यात दरमहा रु.१,५००/- इतकी रक्कम दिली जाईल. तसेच केंद्र/राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे रु. १,५००/- पेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येईल.
अर्ज भरताना तुम्ही शासनाच्या इतर विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनेचा तुम्ही लाभ घेता का?
याला तुम्ही yes ( होय केले) तर तुम्हाला फक्त उर्वरित रक्कम भेटेल. ( खाली पाहा कसे ते)
pm किसान योजनेचे लाभार्थी लाभ घेत असेल तर त्या व्यक्तीला ( उरलेले ५०० रू फक्त मिळतील) pm किसन केंद्राचे ५०० दरमहा आणि नमो योजनेचे ५०० दरमहा असे असेल तर उर्वरित ५०० फक्त भेटतील याची लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी.
pm किसन हप्ता तसेच नमो हप्ता २००० असतो ( प्रत्येक ४ महिन्याने म्हंजे महिन्याला ५०० असे याठिकाणी म्हंटले आहे)
लाभार्थी पात्रता:
१)महाराष्ट्र राज्यातील २१ ते ६५ या वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या आणि निराधार महिला.
२)लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक आहे.
३)राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या आणि निराधार महिला.
४)सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभाथ्यांचे बैंक खाते असणे आवश्यक आहे. )
५)सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुध्दा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे
अपात्रता:-
१) ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता ( income tax भरणारे)
३) ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित / कायम कर्मचारी / कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग / उपक्रम /मंडळ/भारत सरकार किंवा राज्य सरकारच्यास्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत.
४) सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे रु. १,५००/- पेक्षा जास्त लाभ घेतला असेल.
५) ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार/आमदार आहे.
६) ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड / कॉर्पोरेशन / उपक्रमाचे अध्यक्ष / उपाध्यक्ष / संचालक / सदस्य आहेत.
७) ज्यांच्याकडे चारचाकी वाहने ( ट्रॅक्टर वगळून) त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत.) ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे.
कागदपत्रे: ( नवीन नियमानुसार)
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- रेशन कार्ड ( पिवळे/ केशरी पैकी कोणतेही)
- लाभार्थी महिलेकडे आधिवास प्रमाणपत्र (Domancile) उपलब्ध नसेल तर त्या ऐवजी १५ वर्षापूर्वीचे…रेशन कार्ड किंव्हा मतदार ओळखपत्र किंव्हा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंव्हा जन्म दाखला या ४ पैकी कोणतेहे ओळखपत्र/प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येणार आहेत.
- पासपोर्ट size फोटो
- सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र.
अर्ज करण्याची अंतिम मुदत:
दि.१ जुलै, २०२४ ते दि.३१ ऑगस्ट, २०२४ पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल.
पहिला हप्ता कधी भेटणार:
३१ ऑगस्ट, २०२४ पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दि.०१ जुलै, २०२४ पासून दर माह रु.१५००/- आर्थिक लाभ देण्यात येणार आहे.
असा करा अर्ज
Step १
डाऊनलोड ॲप : नारीशक्ती दूत ॲप प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करा. किंव्हा या लिंक वर क्लिक करून करा.
Narishakti doot app डाऊनलोड करा प्ले स्टोअर वरून.

Step २
लॉगिन करा : महिलेचा किंव्हा तिच्या पतीच्या मोबाईल नंबर टाका. नंतर टर्म अँड कंडीशन वर क्लिक केल्यावर स्वीकारा असा ऑप्शन येईल त्यावर क्लिक करून शेवटी लॉगिन बटण वर क्लिक करा.
( खालील प्रमाणे)

Step ३
लॉगिन केले की ४ अंकी otp येतो तो टाकने आणि verify otp यावर बटण वर क्लिक करणे
Step ४
खाली दिलेल्या माहिती भरण्यासाठी येथे क्लिक करा त्यावर क्लिक करणे.

Step ५
खालील माहीती भरा:
महिलेच नाव, ईमेल आयडी,जिल्हा ,तालुका आणि नारीशक्ती प्रकार ई निवडून update या बटणावर क्लिक करा.

Step ६
आत्ता खालील पेज दिसेल यात तुम्हाला मुख्यमंत्रि माझी लाडकी बहीण योजना यावर क्लिक करा.

step 7 आत्ता अर्ज ओपन होईल त्यात माहिती भरा: (अर्ज कसा ते पहा)



उत्पन्नाचे प्रमाणपत्र याठिकाणी रेशन कार्ड जरी अपलोड केले तरी चालते.
अर्जदराचा फोटो यावर क्लिक केल्यावर कॅमेरा चालू होईल त्यात लाईव्ह फोटो घेयचा आहे.
खालील हमीपत्र प्रिंट काढून त्यात लाभार्थी ची माहिती भरून त्याची pdf करून अपलोड करा ( accept हमीपत्र डिसक्लेमर या ठिकाणी)

हे सर्व upload केल्यानंतर एक नवीन पेज येईल तिथे फॉर्म सबमिट करणे. किवा केलेला अर्ज या बटणावर क्लिक केल्यावर संपूर्ण अर्ज येईल त्याच्या खाली सबमिट बटन येईल त्यावर क्लिक करणे. सबमिट वर क्लिक केल्यास अर्ज यशविरीत्या भरला जाईल. नंतर तुमचा फॉर्म aproval साठी जाईल सर्व कागदपत्रे व माहिती ओके असेल तर aproval भेटते आणि मगच शासनाचे हप्ते मिळण्यास सुरूवात होईल.
मित्रानो माहिती आवडल्यास इतर what’s ग्रुप वर पाठवा.
काही अडचण आल्यास खाली व्हॉट्स ॲप लिंक दिली आहे त्यावर जोईन होऊन विचारू शकता.
**********धन्यवाद *********
AGRIMANIA
follow us on what’s app