
नमस्कार शेतकरी बंधूंनो ज्या शेतकरी बंधूंनी महाडीबीटी वर फळबाग लागवडीसाठी अर्ज केले होते त्यांची काल दिनांक 12 जुलै 2024 रोजी सोडत निघाली आहे.
कागदपत्रे अपलोड करा
शेतकरी मित्रांनो तुम्हाला मेसेज आला असेल कागदपत्रे अपलोड करा म्हणून तर तुम्हाला खालील कागदपत्रे अपलोड करायचे आहेत.
कागदत्रे:
- ७/१२
- आठ अ
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- हमीपत्र
- सामायिक उतारा असल्यास गटातील इतर शेतकऱ्यांचे संमती पत्र
- SC/ST मधील लाभार्थी असल्यास जातीचे प्रमाणपत्र जोडावे
वरील सर्व कागदपत्रे ही लाभार्थी ची निवड झाल्याचा sms त्यांच्या मोबाईल वर आला असल्यास त्याने ७ दिवसाच्या आत अपलोड करणे बंधन कारक आहे अन्यथा त्याचा अर्ज रद्द होतो.
कागदपत्रे कोठे अपलोड करावीत:
लाभार्थी ने स्वतः फॉर्म भरला असल्यास तो स्वतः त्याच्या मोबाईल वरून कागदपत्रे अपलोड करू शकतो.

जर लाभार्थी ने csc सेंटर वर फॉर्म भरला असेल तर तिथून तुम्ही वरील डॉक्युमेंट अपलोड करू शकता.
कागदपत्रे अपलोड केली पुढे काय?
शेतकऱ्याने कागदपत्रे अपलोड केल्या नंतर कृषी सहायक ते कागदपत्रे छाननी करून ज्या गटात शेतकर्याला फळबाग करायची आहे त्या जागेचे स्थळ पाहणी करून ते पूर्व संमती साठी पाठवले जाते.
पूर्व संमती मिळाली की शेतकरी फळबाग लागवड करू शकतात.
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना
१ रुपयात पीक विमा भरण्याची सर्व प्रोसेस
१० लाख सबसिडी उद्योग उभारणीसाठी
*****Agrimania******