
प्रधानमंत्री पीक विमा योजना उद्देश्य:
नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगसारख्या अकल्पित प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे आणि आर्थिक पाठबळ देणे हा प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा उद्देश आहे.
योजनेचा फायदा कोणाला:
- सदरची योजना ही अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील केवळ अधिसूचित पिकांसाठी असेल.
- अधिसूचित क्षेत्रातील पिकांसाठी खातेदारांचे व्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेग्यास पात्र आहे.
- ही योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक करण्यात आली आहे ज्या शेतकऱ्यांनी अधिसूचित पिकासाठी कोणत्याही वित्तीय संस्थांकडून (सहकारी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, वाणिज्य बैंका, खाजगी बँका आणि वगैरे) हंगामी पिक कर्ज घेतले आहे आणि जे अंतिम मुदतीच्या सात दिवस अगोदर योजनेतून बाहेर पडलेले नाहीत असेशेतकरी त्यांच्या वित्तीय संस्थाद्वारे योजनेत नाव नोंदणी करण्यास पात्र असतील.
Also read: कांदाचाळ योजना
कोणत्या जोखमी या योजने अंतर्गत येतात:
या योजने अंतर्गत शेतकऱ्यास टाळता न येण्या जोग्या कारणामुळे झालेल्या नुकसानीस विमा संरक्षण मिळेल•
1) प्रतिकूल हवामान घटकामुळे पेरणी / लावणी / उगवण न होणे:
हंगामातील अपुरा पाऊस, हवामानातील इतर घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे केवळ अधिसूचित मुख्य पिकांची अधित्तूषित क्षेत्रात व्यापक प्रमाणावर पेरणी / लावणी होऊ न शकलेल्या क्षेत्रासाठी पेरणी / लावणी न झालेले क्षेत्र हे सर्वसाधारण पेरणी क्षेत्राच्या ७५ टक्के पेक्षाजास्त असल्यास विमा संरक्षण देय राहील,
2) मध्य हंगामातील प्रतिकुल परिस्थितीत झालेले नुकसानः
सर्वसाधारण काढणीच्या १५ दिवस आधीपर्यंत पूर, पावसातीलखंड, दष्काळ इ. बाबीमुळे शेतक-यांच्या अपेक्षित उत्पादनामध्ये मागील लगतच्या 7 वर्षाच्या सरासरी उत्पादनाच्या ५० टक्के पेक्षा जास्त घट अपेक्षित असेल तर विमा संरक्षण देय राहील.
3) पीक पेरणी पासून काढणीपर्यतच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनात येणारी घटः
दुष्काळ, पावसातील खंड, पूर, क्षेत्र जलमय होणे, कीड व रोगांचा व्यापक प्रादुर्भाव, भूस्खलन, नैसर्गिक आग, वीज कोसळणे, वादळ, गारपीट आणि चक्रीवादळ यासारख्या टाळता न येणान्या जोखमीमुळे पिकाच्या उत्पादनात येणाऱ्या घटीपासून व्यापक संरक्षण दिले जाईल.
4) स्थानिक नैसर्गिक आपत्तीः
या बाबी अंतर्गत गारपीट, भूस्खलन, विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, ढगफुटी अथवा वीज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त झाल्यामुळे होणारे अधित्तूचित पिकाचे ठराविक क्षेत्रातील नुकसान हे वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून निश्चित करण्यात वेईल नुकसानग्रस्त शेतक-याने ७२ तासाच्याआत कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक किंवा क्रॉप इन्शुरन्स ऍप किंवा विमा कंपनी प्रतिनिधी, थेट संबंधित बँक, स्थानिक कृषी विभाग जिल्हा अधिका-यांमार्फत गावाची माहिती द्यावी.
5) काढणी पश्चात नुकसान:
ज्या पिकांची कापणीनंतर शेतात पसरवून अथवा पेंढी बाधून सुकवणी करणे आवश्यक असते अशा कापणी / काढणी नंतर सुकवणीसाठी शेतात पसरवून ठेवलेल्या अधिसूचित पीकाचे कापणीनंतर १४ दिवसाच्या आत गारपीट, चक्रीवादळ, चक्रीवादळामुळे आलेला पाऊस आणि बिगर मोसमी पावसामुळे गुकसान झाल्यास वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून मार्गदर्शक निकषांचे व विमा संरक्षित रकमेच्या अधिन राहून नुकसान भरपाई निश्चित केली जाईल. नुकसानग्रस्त शेतकन्याने ७२ तासाच्या आत कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक किंवा क्रॉप इन्शुस्स अॅप किंवा विमा कंपनी प्रतिनिधी, थेट संबंधित बँक, स्थानिक कृषी विभाग, जिल्हा अधिका-यांमार्फत दाव्याची माहिती धावी.
हेही वाचा: भाऊसाहेब फुंडकर फळबागांना 100% अनुदान योजना
योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:
- आघारकार्ड (बंधनकारक)
- पिक लागवड स्वयंघोषणा पत्र
- पिकांची नोंद असलेला सातबारा उतारा
- बैंक पासबुक किंवा रद्द केलेला धनादेश
- संपूर्ण भरलेले विमा प्रस्ताव अर्ज
- भाडेतत्त्वावरील शेती असल्यास नोंदणीकृत भाडेकरार
ई-पीक पाहणीः
ई-पीक पाहणी अंतर्गत पिकाची नोंद करण्यात यावी, विमा योजनेत विमा घेतलेले पीक व ई-पीक पाहणीमध्ये नोंदविलेले पीक यामध्ये तफावतीचा उद्भवल्यास ई-पीक पाहणीमध्ये नोंदविलेले पीक अंतिम गृहीत धरण्यात येईल.
अधिसूचित पीके, प्रधानमंत्री पीक विमा योजना रक्कम, अर्ज भरण्याची अंतिम मुदत यांचा तपशील खालील प्रमाणे:
पिकाचे नाव | प्रति हेक्टर विमा रक्कम (रू. मध्ये) | अंतिम तारीख़ |
ज्वारी | 20,000 ते 32500 | 15 जुलै 2024 |
बाजरी | 18000 ते 33913 | 15 जुलै 2024 |
सोयाबीन | 31250 ते 57267 | 15 जुलै 2024 |
मूग | 20,000 ते 25817 | 15 जुलै 2024 |
उडीद | 20,000 ते 26,025 | 15 जुलै 2024 |
तूर | 25,000 ते 36,802 | 15 जुलै 2024 |
कापूस | 23,000 ते 59,983 | 15 जुलै 2024 |
मका | 6000 ते 35,598 | 15 जुलै 2024 |
भात | 40,000 ते 51,760 | 15 जुलै 2024 |
नाचणी | 13,750 ते 20,000 | 15 जुलै 2024 |
कारळे | 13,750 ते — | 15 जुलै 2024 |
भुईमूग | 29,000 ते 42,971 | 15 जुलै 2024 |
तीळ | 22,000 ते 25,000 | 15 जुलै 2024 |
कांदा | 46,000 ते 81,422 | 15 जुलै 2024 |
आपले सरकार सेवा केंद्र (CSC) धारकास विमा कंपनी मार्फत प्रति अर्ज रू. 40/- अदा करत असल्या कारणाने शेतकर्यांना अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही.
योजना संबधित अधिक माहितीसाठी कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाइन क्रमांक: 14447 यावर संपर्क साधा.
वेबसाइट: https://www.pmfby.gov.in/
मित्रांनो ही माहिती तुमच्या शेतकरी बांधवांना शेयर करायला विसरू नका.
**********धन्यवाद *********