नमस्कार, शेतकरी बांधवांनो आजच्या लेखात आपण केळी विषयी प्राथमिक माहिती जसे,

केळी लागवड कधी करावी,

हवामान, आणि

drip खर्च किती येतो एकरी,

जमीन मशागत कशी करावी,

आणि रोपांची काळजी कशी घ्यावी या बाबी पाहणार आहोत..

केळी लागवड कधी करावी :

साधारणपणे केळी लागवड ही वर्षभर चालते. परंतु सर्वात safe लागवड कालावधी माझ्या मते हा सप्टेंबर ते 15 मे पर्यंत या दरम्यान करू शकता म्हणजे केळी अवकाळी पावसात नुकसान होत नाही.

केळी लागवड किती अंतरावर करावी :

7 फूट x 5 फूट (७ फूट ओळीतील अंतर ) आणि (५ फूट रोपांमधील अंतर ) या अंतरावर केळी लागवड केल्यास एकरी १२४४ रोपे बसतात .

हवामान :

केळी हे उष्‍ण कटीबंधीय फळ असून त्‍यास साधारण उष्‍ण व दमट हवामान चांगले मानवते. साधारणतः 15 ते 40 डिग्री सेंटीग्रेड पर्यंतचे तापमान या पिकास चांगले मानवते. हिवाळयात 12 सेंटीग्रेडचे खाली व उन्‍हाळयात 40 सेंटीग्रेडपेक्षा जास्‍त उष्‍ण हवामान असल्‍यास पिकावर अनिष्‍ट परिणाम होतो. केळीची पाने तापमान 40 सेंटीग्रेडपेक्षा जास्त असल्‍यास पिवळी पडतात तसेच केळीची वाढ खुंटते. तापमान जर १३ डिग्री सेंटीग्रेड पेक्षा कमी आल्यास केळी ला चील्लिंग येते .उन्‍हाळयातील उष्‍ण वारे व हिवाळयातील कडाक्‍याची थंडी या पिकाला हानीकारक असते. जळगांव जिल्‍हयातील हवा दमट नसली तरी केळी खाली जास्‍त क्षेत्र असण्‍याचे कारण म्‍हणजे तेथील काळी कसदार जमिन, पाणी पुरवठयाची चांगली सोय व उत्‍तर भारतातील बाजारपेठांशी सुलभ, थेट दळणवळण हे होय. तसेच करमाळा भागामध्ये केळीचे जास्त क्षेत्र याचे करण म्हणजे उजनी जलाशय तसेच येथील हवामान केली पिकास चांगले आहे .

केली पिकास तापमानाचा/ हवामानाचा  कसा परिणाम होतो

तापमान जर १३ डिग्री च्या खाली आल्यास केळीला चील्लिंग येते

तापमान जर 40 डिग्री च्या वर गेल्यास केळीची वाढ खुंटते

केळी लागवड करण्यापूर्वी  जमिनीची मशागत कशी करावी : 

पहिली पद्धत : 

ज्या जमिनीत तुम्हाला केळी लागवड करायची आहे त्या जमिनीची अगोदर खोल नांगरट (60-90cm पर्यंत खोल ) करून घ्यावी आणि कमीत कमी १५ दिवस ती जमीन सूर्यप्रकाशात तापू द्यावी . त्यानंतर  ( नागरट मोगडणे/ फनने )त्या जमिनीत फण मारणे ( उभा आडवा)   म्हणजे जे मोठे ढेकूळ असतील ते लहान होतील . नंतर एकरी ४-५ trolly (१०-१५ टन) शेणखत टाकने (विस्कटने) संपूर्ण रानात. आणि पुन्हा त्या रानात फण ( cultivator) मारणे .  येवढे सर्व झाल्यावर मग ७ फूट वर  ड्रीप हाताराने. अशा पद्धतीने जमिनीची मशागत करावी

लक्षात ठेवा :

जमीन जर नांगरणी केली नाही तर केळी ला घड आखूड पडतात आणि त्याचा खोडवा पण नीट येत नाही)

दुसरी पद्धत :

ज्या जमिनीत तुम्हाला केळी लागवड करायची आहे त्या जमिनीची अगोदर खोल नांगरट (60-90cm पर्यंत खोल) करून घ्यावी आणि मग ती जमीन कमीत कमी १५ दिवस सूर्यप्रकाशात तापू द्यावी . त्यानंतर त्या जमिनीत फण मारणे ( उभा आडवा) म्हणजे जे मोठे ढेकूळ असतील ते लहान होतील . रान एकदम लेवल मध्ये झाल्यावर त्यावर ७ फूट वर drip हातरणे. आणि मग शेणखत त्या drip च्य एका बाजूने टकने आणि नंतर power tiller ट्रॅक्टर ने त्यावर माती टाकून भोत तयार करणे. आणि मग drip चे दुसऱ्या बाजूला रोप लावणे.

लक्षात ठेवा:

ज्या बाजूला शेणखत टाकला अगदी त्याच बाजूला रोप लावू नये तर त्याच्या दुसऱ्या बाजूला रोप लावणे.

( जर रोप शेणखत वर लावल्यास खताच्या उष्णतेने रोपांना शॉक लागतो आणि मर प्रमाण रोपत वाढते.)

एकरी ड्रीप किती लागते आणि किती खर्च येतो ड्रीपचा केळी लागवड करताना:

१ एकर म्हणजे ४३,५६० फूट वर्ग जर तुम्हाला ७ फूट वर केळी लागवड करायची असल्यास : ४३५६० ला ७ ने भागले तर उत्तर येते ६२२२ फूट आत्ता एक ड्रीप चा बंडल असतो २५० मीटर चा (साधारण 800 फूट ) ६२२२ फूट ला 800 फूट ने भागले तर उत्तर येल ७.७ म्हणजे ८ बंडल लागतील एकरी (साधारण non isi ड्रीप किमत असते १२०० ते १४०० पर्यंत )१४०० x ८ केले तर उत्तर येल ११,२०० रुपये खर्च यईल एकरी ड्रीप चा .(pipe खर्च वगळून )

२) रोपांची काळजी कशी घ्यावी

रोपे नर्सरितून / कंपनीतून आपल्या घरी आल्यावर आपण काय दक्षता घ्यायची:

खालील गोष्टी कराव्यात : 

  1. रोपांचे tray ठेवताना त्या मध्ये ६-८ इंच अंतराने ठेवावीत जेणे करून हवा खेळती राहील आणि रोपांची गर्दी होणार नाही 
  2. रोपांना पाणी देताना दिवसातून एकदाच पाणी देणे एकतर सकाळी ८ च्या अगोदर नाहीतर संध्याकाळी ८ नंतर 
  3. पाणी देताना रोपांच्या खालून पण पाणी सोडणे आणि वरून पण पाणी फवारणे/ पिच्काराने  .
  4. रोपांना सावली आणि उन दोन्ही भेटेल अश्या ठिकाणी ठेवने आणि रोपंच्या कडेने कुंपण करावे .
  5. रोपे ४-६ पानांची सशक्त असावीत लागवडीसाठी .
  6. उन्हाळ्यात रोपे हे सावली नसल्यास shednet (हिरवा कापड ) टाकावे वरून .
  7. रोपांची root चेक करणे चालू आहेत का ते पाहणे दर २ दिवसांनी 
  8. रोपे कमीत कमी १ आठवडा आणि जास्तीत जास्त १५ दिवस  तरी घरी ठेवावीत.
  9. ज्या दिवशी रोपे लावणार आहेत त्याच्या २-३  दिवस अगोदर रोपांना फक्त उन भेटेल या स्थित मध्ये ठेवा म्हणजे रोपे हार्ड होतील , आणि पाणी सकाळी किंवा संध्याकाळी च द्या .
  10. रोपावर फवारणी करणे एक ( १६ लिटर पंपसाठी १९-१९-२९—  २० ग्रॅम ( साधारण २ काडीपेटी) + micronutrient—- १० ग्रॅम ( साधारण १ काडीपेटी) + स्टिकर ८-१० मिली ) ला घेऊन फवारनि करणे रोपांवर .)

पत्र्याच्या शेड मध्ये रोपे ठेऊ नयेत . 

रोपांन दुपारी / उन असताना पाणी देऊ नये  ( जर दिले तर धग (गरम वाफ जमिनीची ) चालते आणि मुळना शॉक लागू शकतो .

रोपे पूर्ण सावली मिळेल अश्या ठिकाणी पण  ठेऊ नका 

पुढील लेखात आपण खालील माहिती पाहणार आहोत:

लागवड केल्यानंतर कोणती द्रेंचिंग घ्यावी

खत नियोजन

पाणी नियोजन

घड व्यवस्थापन

रोग व्यवस्थापन…इत्यादी

agrimania.in

Agrimania platform