
नमस्कार शेतकरी मित्रानो आजचा आपला विषय आहे केळी घड व्यवस्थापन ते कसे करावे. ते आज आपण या ठिकाणी सविस्तर माहिती पाहणार आहोत.
- केळी येणं होत असताना कोणते खत सोडले पाहिजे.
- केळीची वादी वाढवण्यासाठी काय सोडावे/ फवारणी घ्यावी.
- केळी फणी मध्ये चांगले अंतर येण्यासाठी काय करावे.
- केळीतील मच्छर फवारणी साठी बेस्ट कीटकनाशक कोणते.
- केळी फुगवणी ( size ) साठी काय सोडले पाहिजे.
- केळी करपा आला असल्यास कसा कंट्रोल करावा.
- केळी घडा वर डाग असल्यास काय फवारणी घावी.
- केळ फुल (कंबळ) कधी व किती अंतराने मोडावे व किती फण्या ठेवावीत.
- Fruit care कसे करावे व्हिडिओ
शेतकरी बंधूंनो, कोणत्याही पिकाच्या मुख्य ३ अवस्था असतात.
१) वाढीची अवस्था ( vegetative stage)
२) फुलोऱ्याची अवस्था ( flowring stage)
३) फळाची अवस्था ( bunch development stage)
वाढीची अवस्था मध्ये पिकांना नत्र + स्पुरद + पालाश यांची आवश्यकता असते.eg जसे की ( १९-१९-१९) या खतात 19% नत्र :19% फॉस्फरस: 19% पोटॅश आहे
फुलोऱ्याची अवस्था ऑर केळी मध्ये म्हण्याचे झाले तर केळी येणं होत असताना ची अवस्था यात मुख्यतो स्पुरद आणि पालाश गरज असते .eg ( 0-52-34)
फळाची अवस्था यात मुख्यतो पोटॅश ची गरज जास्त असते जसे की, 0-0-50, 13-0-45 याप्रकारे. आज आपला विषय आहे केळी घड व्यवस्थापन.
केळी घड व्यवस्थापन:
शेतकरी मित्रांनो केळी घड व्यवस्थापन हा अतिशय महत्वाचा विषय आहे. कारण एक्सपोर्ट क्वालिटी च घड आणायचा म्हंटले तर त्याचे खत व्यवस्थापन, फवारणी, fruit केअर या गोष्टी आल्याचं यात. येथे आपण सर्व प्रश्नांची चर्चा करणार आहोत.
केळी येणं होत असताना कोणते खत सोडावे:
केळी येन होण्याच्या १५ दिवस अगोदर तुम्हाला केळीला भेसळ डोस करायचा आहे. यात तुम्ही ४०० ते ५०० ग्रॅम खत प्रति झाड याप्रमाणे डोस करायचा आहे.
ज्या वेळी केळी येन झाल्याची दिसेल त्या वेळी केळीला एकरी ५०० मिली swal कंपनीचे cascade हे कीटकनाशक drip ने सोडायचे आहे याने काय होईल तर केळी पीक जवळपास १०-१५ दिवस विषारी बनते आणि मच्छर, thrips, ऑर अन्य रस शोषक किडी पासून बचाव होतो आणि घडावर डाग पडत नाहीत.
खत सोडणे : एकरी ४ किलो 0-52-34 सोडणे येन होत असताना
केळीची वादी वाढवण्यासाठी काय सोडावे/ फवारणी घ्यावी.
केळी वादी अतिशय महत्वाचा भाग कारण केळी वादी आखूड असल्यास अशी केळी एक्सपोर्ट साठी घेत नाहीत. त्या मुळे केळीची वादी साठी विशेष लक्ष देणे फार महत्वाचे असते.
फावारणी १ : एलिफंटा + GA
फवारणी २: वृक्षामृत 100 मिली / पंप
केळी फणी मध्ये चांगले अंतर येण्यासाठी काय करावे.
खत सोडणे : 13-0-45 एकरी 5 किलो.+ amonium sulfate 5 किलो एकरी or 1250 झाडांसाठी.
केळी तील मच्छर फवारणी साठी बेस्ट कीटकनाशक कोणते.
Phendal हे कीटकनाशक वापरा १५ लिटर साठी ४० मिली जवळपास १५ ते २० दिवसापर्यंत मच्छर पासून संरक्षण मिळते बागेला. बाकीचे पण आहेत जसे karate, mustang, पण findal रिझल्ट उत्तम आल्यामुळे सुचवला आहे.
प्रमाण : २ मिली प्रती लिटर

केळी फुगवणी ( size ) साठी काय सोडावे
केळीचे केळ फुल मोडल्या पासून १३-०-४५ देण्यास सुरवात करावी.
एकरी प्रमाण : १३-०-४५ एकरी ४-५ किलो देणे नंतर 6 दिवसांनी 0-0-50 देणे असे 5-6 दिवसाच्या अंतराने देणे.
जर 15-20 दिवसाच फरकाने water soluble micrinutrient drip ने देणे एकरी 2 किलो.
Micronutrient: TATA TRACEL किंव्हा पूर्वा कंपनीचे मिलांज.

तसेच प्रत्येक 15 दिवसांनी मुळी चेक करणे मुळी बंद पडल्यास mycorhyza घटक असणारे कोणतेही एक + 2 किलो गूळ टाकून त्यात एक दिवस अंबवून दुसऱ्या दिवशी drip ने सोडणे.
केळी घडाच्या वाढीच्या शेवटच्या टप्प्यात घड वजन वाढीसाठी phenoaqua कंपनीचे 7-11-37 या ग्रेड चे खत सोडणे एकरी 3-4 किलो.
करपा आला असल्यास कसा कंट्रोल करावा.
केळी येन होत असताना केळीचे पाने पिवळी पडतात पण कधी कधी ही पिवळी पडलेले पाने करपा नसतो तर काही nutrirnt चे कमतरतेमुळे ती पडलेली असतात.
- पानाच्या कडा (margin) पिवळ्या पडल्या तर त्या फॉस्फरस कमतरतेमुळे पडलेली असतात.
- पानाच्या शेंडा कडून पान पिवळे पडले असेल तर ते potash कमतरता असते.
- Magnesuim ची कमतरता पडली की पाने पिवळी पडतात.
- तसेच केळीला पाणी कमी पडले or जास्त झाले तरी पाने पिवळी पडतात. मग करपा आहे ते कसे ओळखायचे.करपा २ प्रकारे असतो आणि दोन्ही ही बुरशी (fungas) मुळे होतात.

घटक | पिवळा करपा | काळा करपा |
Found | हिवाळा/ पावसाळ्यात | उन्हाळ्यात दिसतो |
Spot | पानाच्या दोन्ही बाजूस | पानाच्या वरच्या बाजूस |
फवारणी | Arryn फवारणी | Arryan फवारणी |


करपा कसा कंट्रोल करायचा :
पहिल्या स्टेज वर करपा असेल तर Blast drip ने सोडणे
करपा जास्त असेल तर खालील फवारणी htp ने घेणे : २०० लिटर बॅरल साठी १०० ग्रॅम nativo + १०० मिली Tatamida + ४ streptocyclin पुढी+ स्टिकर १०० मिली
किंव्हा
करपा खूप जास्त झाल्यास swal कंपनीचे Arryn ८०० ग्रॅम प्रति २०० लिटर बॅरल + स्टिकर100 मिली वापरून HTP ने फवारणी घ्यावी.( याने कंट्रोल होतोच).

केळी घडा वर डाग असल्यास काय फवारणी घावी.
फवारणी : १५ लिटर पंपासाठी:
८ मिली tatamida किंव्हा confidor + ८ मिली amistar or amistar top
केळ फुल (कंबळ) कधी व किती अंतराने मोडावे.
केळफुल (कंबळ) मोडताना विशेष काळजी घ्यावी लागते.
- कंबळ शक्यतो हाताने मोडावे.
- शेवटच्या फणी पासून ८ इंच दांडा ठेवावा.
- केळीच्या घडला जर ११ फण्या पडल्या असतील तर गोंडा फणी आणि त्यावरील एक फणी काढून टाकाव्यात साधारणपणे ९-१० फण्या ठेवावीत.
- काही ठिकानी १५-१६ पण फण्या पडतात त्या ठिकाणी २ फण्या काढून १३ पर्यंत फणी ठेवल्यास घडाचे वजन वर पासून खाल पर्यंत घड चांगला नेसवला ( bunch development) होते व वजन पण चांगले भेटते.
वरील सर्व वॉटर soluble खते/ कीटकनाशके महाडिक अग्रोटेक मध्ये उपलब्ध आहे प्रो.प्र अभिजित लक्ष्मण महाडिक 9146518122
घरच्या घरी Fruit care कसे करावे पाहा व्हिडिओ..
fruit care vedio व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा