You are currently viewing खरबूज लागवड संपूर्ण माहिती :

जमिन : काळी,नदी काठची तसेच पाण्याचा उत्तम निचरा होणारी असावी.

किती मायक्रॉन पेपर वापरावा : 20-25 मायक्रॉन

खरबूज लागवड कधी करावी : 1 डिसेंबर ते मे पर्यंत  कधींपण लावू शकता .

( खरबूज हे 65-70 दिवसाचे पीक असल्याने साधारणपणे ज्या दिवशी रमजानचा महिना सुरुवात होतो किंवा रमजान चालू असताना काढता येईल या पद्धतीने करावी कारण या दिवसात रमजानच्या महिन्यांमध्ये खरबुजाला जास्त मागणी असते त्यामुळे तुम्हाला रेट चांगला मिळू शकतो ( लक्षात असू द्या रमजान सण हा प्रत्येक वर्षी हा एक महिना अलीकडे येतो त्यानुसार नियोजन करावे)

वान प्रकारएकरी बीज / रोपेसरासरी एकरी उत्पन्नसरासरी दरकुठे चालते
कुंदण (क्राऊन कंपणी )900015-20 टन15 – 25संपूर्ण महाराष्ट्रात
बॉबी (क्राऊन कंपणी ).900015-18 – टन20-30मुंबई Market

                      बीज 250 gm पॅकेट च्या 4 पुढी लागतात .

                        Mulching पेपर चे एकरी 5 बंडल ( खर्च 6000रु)

  • अंतर पीक म्हणून खरबुजाचा वापर कुठे करू शकतो : ऊस पेरू, केळी
  • जमिन मशागत , बेड सोडण आणी लागवड करणे

सुरवातीला जमिनीची खोल नांगरट करुण घेणे → नंतर जमिन उन्हात तापू देणे → शेणखत टाकणे →  नंतर जमिन फणणे करणे →  आणि नंतर बेड टाकणे .

→ 20-25 मायक्रॉन चा मल्चिंग पेपर बेडवर टाकणे आणि प्रत्येक सवाफूट किंवा प्रत्येक डीपर वर होल पाडून त्यात 1 रोप किंवा 1 बीज टाकणे .

बी किंवा रोप लागवड पासून ते खरबूज मार्केट ला जाईपर्यंत चे नियोजन  कसे करावे.

पानी नियोजन करताना सुरवातीच्या काळात 1 दिवसाआड अर्धातास पाणी देणे.

मार्च एप्रिल मे मधे लागवड केल्यास दररोज 1-2 तास पाणी द्यावे

प्रत्येक 2- 3 दिवसांनी खते देणे 

बी लावल्यापासून तिस-या दिवशी 19-19-19 —-2 किलो आणि Humic acid — अर्धा किलो drip ने सोडणे. 

रोप 5-6 दिवसाचे झाल्यावर metalexyl 35% हे बुरशीनाशक प्रती 200 ली. बॅरल ला 250ग्रॅम सोडणे.

10 त्या दिवशी 12-61… 3 किलो ( फुटवा येण्यासाठी)

15 त्या दिवशी खरबूज वर नाग अळी आढळल्यास खालील पैकी कोणतेही फवारणी घ्यावी . आणी खरबूज protection paper ने झकावे.

( एकरी 4 बंडल protection paper चे लागतात)

नाग आळीवर फवारणी:(यापैकी१)

  1. फवारणी →विल्यम फ्लेक्ससी अर्धा मिली/ली. पाणी
  2. फवारणी → हमला . 2 मिली / ली. पाणी or
  3. फवारणी → बायो R 303 (सुरवातीला)
  4. रोपे मोठे असताना त्रिकाल किंवा lift gard

खरबूज 18-20 दिवसाचे झाल्यावर प्रोटेक्शन paper ने झाकणे पुढील २० दिवस.

15 व्या दिवशी drip ने 13-40-13 एकरी 4 किलो (फूल धरणेसाठी)

प्रत्येक 8-10 दिवसांनी cal. Boran द्यावे ( cal. 2 किलो Broan 1 किलो )

फळ size वाढ होण्यासाठी:

0-52-34 एकरी 4 किलो

फळाला colour येण्यासाठी

0-0-50 एकरी 4 किलो

खरबूज वरिल tonic फवारणी setting साठी.– 13-40-13

खरबूज 100 ग्रॅम size चे झाल्यावर:

micronutrient—2 किलो + टाटा बहार 1 ली. ( खरबूज

बुरशीनाशक रोको/ Bavistin/ saaf यापैकी कोणतेही अर्धा किलो प्रती बॅरल ने सोडणे .

फवारणी डंक माशी वर:

१) fantang pari or stop 1ml / ली. पाणी

बेड टाकून त्यावर Drip हातरणे – step -1

mulching paper Drip वर टाकून बेड झाकणे step-2

प्रत्येक सवाफूटवर (Driper) वर होल पाडणे आणि त्यात बीज किंवा रोप लावणे

step-3

बीज उगवून झाल्यावर 7 दिवसाचा plot

10 दिवसाचा plot

plot साधारण 18 दिवसांचा झाल्यावर protection paper ने झाकणे पुढील 20-22 दिवस 

plot साधारणपणे 40 दिवसांचा झाल्यावर protection पेपर काढणे

plot मध्ये yellow sticky trap लावणे एकरी 25-30 (Thrips control )

plot flower/ fruit setting मध्ये असताना 

@ हार्वेस्टिंग स्टेज 65-70 दिवसांचा plot

बुरशीनाशक

  1. रोको/ Bavistin/ saaf अर्धा किलो प्रती बॅरल ने सोडणे.

किटकनाशके

    1 )  विल्यम फ्लेक्ससी अर्धा मिली / ली पाणी → नाग अळी वर

    2 ) fantang pari or stop 1ml / ली. पाणी →डक माशी वर

फळ सेटिंग 

    1) micronutrient—2 किलो + टाटा बहार 1 ली → सेटिंग साठी

                 (खरबूज 100 ग्रॅम size चे झाल्यावर)

*****धन्यवाद******

टीप: वरील सर्व औषधे महाडिक अग्रॉटेक, शेलगाव चौक, जेऊर जवळ त. करमाळा येथे उपलब्ध आहेत.

  लेखक

 राज महाडिक 

(सहायक कृषि अधिकारी, कंदर) 

आभार’ (विशेष सहाकार्य)

  1. योगेश भानवसे (वांगी -2) 
  2. बालाजी लोणकर (कंदर) 
  3. अमोल माने ( कंदर)

agrimania.in

Agrimania platform